अ-नैतिक ?

सुरूवात कोठून अन कशी करावी हेच समजत नाही, आजकाल मुल मुली शाळेत, कॉलेजला नक्‍की कशासाठी जातात याचा गुप्‍तहेरांमार्फत शोध घेणे गरजेचे झाले आहे. नेमक काय चाललय! पालकांना वाटतय शिकताय पाल्‍य, शिकताय ते खर पण नको ते शिकण पण चाललय.

पालकांनी किती भोळे असावे याला काही मर्यादाच नाही. आपली मुलगी, मुलगा शाळा कॉलेजच्‍या नावाखाली एका दिवसात 100 किमी फिरून साळसूदपणे वेळेत घरी येवून जेवण करतात, आणि ढेकर देवून उदया लवकर जायचे आहे असे सांगून लवकर झोपी जातात. तेंव्‍हा पालकांना किती समाधान वाटते. पालकांनीच घेवून दिलेला मोबाईल गुप्‍तहेरांच्‍यापेक्षा जास्‍त सफाईने वापरून पुन्‍हा नामोनिशाणी न सोडण्‍यात पाल्‍यांचा हातखंडा भोळया पालकांना समजत सुध्‍दा नाही हो. पाल्‍याची खडा न खडा माहिती ठेवणारे पालकसुध्‍दा आपल्‍या पाल्‍याच्‍या हुशारी बद्दल गाफील असतात. त्‍यांची मुलगी, मुलगा निरागसतेचे, भोळेपणाचे असे नाटक करत असतो की, खरी माहिती पुरवणारी व्‍यक्‍ती खलनायक वाटते.

आज बर्याच मुला-मुलींना कमीत कमी दोन प्रकरणे केल्‍याशिवाय शाळेतून कॉलेजला जाणे कमीपणाचे वाटते. कित्‍येकांनी तर शाळेच्‍या वयातच बाकी काहीच ठेवलेले नसते. पालकांना गर्भनिरोधकांची माहिती नसते एवढी यांना असते. हे लोण शहरापुरतेच मर्यादीत नसून अगदी तालूका ते गाव पातळीपर्यंत पोहचले आहे. गावात लगेच चर्चा होते म्‍हणून प्रमाण कमी आहे. परंतू शहर व तालूक्‍यांमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये तर पढे जाण्‍याची स्‍पर्धा लागली आहे. कोणीच मागे नाही. हे सर्व पाहता अगदी नाईलाजाने असे म्‍हणावेसे वाटते की मुलींना न शिकवता लहानपणीच लग्‍न लावून दिले जात असे तेच योग्‍य होते. या वयात शारिरीक आकर्षण असतेच पण सयंमपण गरजेचा असतो हेच आजकाल शिकवले जात नाही.

महाविदयालयात जाईपर्यंत तर अनेकांंचे दोन-तीन संसार होउन गेलेले असतात. अश्‍या व्‍यक्‍ती पुढील आयुुुुुुष्‍यात काय अन कसा संसार करणार, दोघांनाही माहित असते की फक्‍त तडजोड चाललीय, चालली तोपर्यंत चालते नंतर रस्‍ते वेगळे वेगळे. यामुळे खरेतर घटस्‍फोटाचे प्रमाण वाढत आहे. परंतु पालक आजही जुन्‍या परंपरांच्‍या ओझ्या खाली पाल्‍याचे लग्‍न लावून देतात. परंतू पुलाखालून किती पाणी आधीच वाहून गेले आहे याची बर्याच पालकांना साधी कल्‍पना सुध्‍दा नसते.

माझा मुलगा किंवा मुलगी तसल काही करणारच नाही याची त्‍यांना पुरेपूर खात्री असते. त्‍यामुळे त्‍यांना प्रकरण समजले तरी समोरच्‍यावर खापर फोडून नामानिराळे राहचे कसे याचे प्रात्‍यक्षिक बरेच पालक समाजाला करून दाखवतात. आपला गंगाधरच शक्‍तीमान आहे याची साधी शंका सुध्‍दा त्‍यांना येत नाही. मुला मुलींचे मित्र मैत्रि‍णी एकमेकांना सांभाळून घेत पालकांची भूमिका सुध्‍दा यथार्थपणे बजावतात. आपल्‍या पाल्‍यापेक्षा त्‍यांच्‍या मित्रांंवर अधिक भरोसा ठेवणारे पालक, भरोश्‍याच्‍या म्‍हशीला टोणगा ही म्‍हण विसरलेले असतात, किंवा त्‍यांना ती म्‍हणच माहित नसते.

आजच रिलेशनशिप अशा गोंडस नावाखाली शरिरसुख सर्रास भोगले जात आहे. लग्‍नाचे बंधन मुला-मुलींना अजिबातच नकोय, परंतू बिनलग्‍नाचेे जर बाळ झाले तर पुढे काय करायचे याची योजना नसल्‍याने लग्‍न व्‍यवस्‍था अजून तरी टिकून आहे. आज तरी समाजाचा थोडा दबाव आहे म्‍हणून लग्‍न करून घटस्‍फोट तरी घेतला जातो. पण लवकरच लग्‍न ही पध्‍दती बंद होईल. मंगल कर्यालयावाल्‍यांनी आधीच तरतूद करून ठेवावी.

आम्‍ही मोबाईल रोज तपासतो, बरेच जण असा दावा छातीठोकपणे करतील. अरे पण जर त्‍यात काही पुरावा शिल्‍लक ठेवला असेल तर काहीतरी हाती लागेल ना, सिमकार्ड सुध्‍दा वेगळे असते व नंबरसुध्‍दा मोबाईलमध्‍ये न साठवता करता मेंदून साठवलेला असतो.

एज्‍यूकेशन व एजॅॅॅॅॅॅॅॅॅॅक्‍युलेशन एकसाथच करणारी ही पिढी पाहून, सुप्रि‍म कोर्टानेसुध्‍दा व्याभिचार व समलैंगिकतेला गुन्‍हयाच्‍या श्रेणीतून बाहेर काढले आहे. अशा वेळी बिचारे पालक काय करणार. फकत एवढेच म्‍हणणारः

कालाय तस्‍मै नमः

स्‍त्री-पुरूष असमानता

कायदयाच्‍या जगात सर्वजण सारखे समजले जातात. सर्वांंना समान न्‍याय मिळावा म्‍हणून कायदा तयार केला गेला. परंतू आज तोच कायदा न्‍यायाच्‍या नावाखाली अन्‍याय करत आहे व त्‍याचा साधा विरोधसुध्‍दा पुरूष करू शकत नाही.

स्‍त्री सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली स्त्रि‍यांच्‍या शब्‍दाला अवास्‍तव महत्‍त्‍व देवून कायदयाने समस्‍त पुरूष मंडळींवर उघड उघड अन्‍याय करण्‍याचे सत्र, न्‍यायाच्‍या नावाखाली सुरू केले आहे. स्‍त्री बोलेल ते ब्रम्‍हवाक्‍य समजून पुरूषांचे म्‍हणणे ऐकून न घेता त्‍यांच्‍याविरूध्‍द सराईत गुन्‍हेगारासारखे गुन्‍हे नोंदवून जगणे मुश्‍कील करण्‍याचे काम कायदयाने केलेले आहे.

खास करून पती व त्‍याचे घरचे म्‍हणजे वेठबिगार असल्‍यासारखी वागणूक कायदा देत आहे. पती व सासरचे यांचे म्‍हणणे ऐकून न घेता खरे-खोटे यांची शहनिशा न करता सरळ उचलून जेलमध्‍ये टाकण्‍याचे आदेश पोलिसांना देणेत आलेले आहेत. त्‍यांना तर आयतेच कुरण मिळाले आहे. कुुुुुुुुुुुुुुुटूंबव्‍यवस्‍थेचा फज्‍जा उडविण्‍याचे काम आज कायदा स्‍वतः करत आहे.

आजची स्‍त्री हि स्‍वतःच्‍या फायद्यासाठी बिनदिक्‍कतपणे खोटे आरोप करून, कायदयाचा आसरा घेउन पैसे उकळण्‍याचे काम करत आहे. तसे करणे तिचा हक्‍कच आहे असे प्रतिपादन कायदा करतो. विश्‍वासघातकी स्‍त्रीया याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत, व नैराश्‍यातून पती आत्‍महत्‍त्‍या करत आहेत.

आजकाल अनेक मुलींचे शाळेत असल्‍यापासूनच प्रेमप्रकरणेे सुरू असतात. परंतू घरच्‍यांच्‍या दबावाने त्‍यांना दुसरीकडे लग्‍न करावे लागते. काहींचे मन वर्षा दोन वर्षातच भरते, संसार ओझेे वाटायला लागतो. काहींच्‍या अपेक्षा पती पुुर्ण करू शकत नाही. मग पती व सासरचे अडचण वाटायला लागतात. त्‍यांचा छोटासा विरोध सुध्‍दा भयानक वाटायला लागतो. माहेरी कागाळया, तक्रारींचा पाउस पडायला लागतो. माहेरच्‍यांना वाटते की मुलीला भयानक त्रास सुरू आहे. यातच कधीतरी पतीचा तोल सुटतो आणि एखादी कानाजवळ वाजविली जाते. त्‍यानंतर खरेे महाभारत सुरू होते.

थोडे खरे अन बरचसे खोटे आरोप, प्रत्‍यारोप यात सासर माहेर दोन्‍ही भरडून निघतात, वकीलांची सुगी सुरू होते. पतीचे पैसे कमी होउन वकीलांंची इस्‍टेट वाढते. पती चारचाकी वरून दोनचाकी वाहनावर येतो. उलट वकील दोन चाकी वाहनावरून चारचाकी वाहनावर येतो. हे सगळे ि‍दिसत असूनही या चक्रातून बाहेर कसे यायचे हे दोघांनाही कळत नाही. अन कळलेच तर वळत नाही. चार सहा वर्षांनी जर निकाल लागला तर लागला नाहीतर आयुष्‍य निघून जाते.

पतीला अद्दल घडविण्‍याच्‍या नादात स्त्रीया आपल्‍या स्‍वतःचे व मुलांचे भविष्‍य बिघडवून टाकतात. अशा स्थितीत समजदार माणसाला मध्‍ये घेवून तातडीने वाद मिटविणे गरजेचे असते. परंतू सुशिक्षीत स़्त्रीचा अहंकार तडजोड करू देत नाही. सर्व सासर माहेरचे मानसिक स्‍वास्‍थ्‍य नष्‍ट करून यातील बर्याच स्रिया आपल्‍या बाहेरख्‍यालीपणाची हौस भागवून घेतात.

समाजाला कुपरिस्थितीला नेण्‍यास हा एकांगी कायदा जबाबदार आहे. खोटे आरोप करूनसुध्‍दा स्‍त्रीवर कसलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. कायदयाने खोटे आरोप करणे हा गुन्‍हा आहे. न्‍यायालयात शपथेवर खोटी माहिती देणे हा सुध्‍दा गंभीर गुन्‍हा आहे. असे म्‍हटले जाते की कायदा गाढव आहे ते अशा प्रकरणांमध्‍ये प्रकर्षाने समोर येते.

पूर्वीच्‍या काळी जर काडीमोड होणार असेल तर पंचायत भरून तातडीने निकाल दिला जात असे. परंतू आज मात्र वर्षन वर्ष केस रखडत ठेवून आयुष्‍याची परवड करण्‍याचे काम केले जाते.

जर एकत्र राहणे शक्‍यच नसेल तर आपआपसात तडजोड करून निर्णय घेणे गरजेचे आहे. मुलीच्‍या वडीलांनी लग्‍नासाठी केलेला खर्च भरून देण्‍याची कसलीही तरतूद कायदयात नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्‍यासाठी वाटेल तसे खोटे आरोप करून स्‍वतःची इज्‍जत घालवून मुलगी परत पतीकडे नांदायला पाठवण्‍याचा गाढवपणा अनेकजण करतात. त्‍यानंतर त्‍या स्त्रीला पतीच्‍या घरात पहिल्‍यासारखी किंमत राहत नाही. पतीलाही तिच्‍या सोबत राहणे कसेतरीच वाटत असते, यातून परत भांडणे व परत कोर्ट कचे-या सुरू होतात. यात मुलांचे अत्‍यंत हाल होतात. त्‍यांच्‍यावर विपरीत मानसिक परिणाम होतात. असे होउ नये म्‍हणून खास करून पत्‍नीने समंजस भूमिका घेणे महत्‍त्‍वाचे असते. अन्‍यथा मुलांचे वाटोळेे ठरलेलेच असते.

काळानुसार जिवनमानात अनेक बदल होतात. परंतू आजचे बदल बघीतले की एकच म्‍हणावेसे वाटतेः

कालाय तस्‍मैै नमः

सरकारचे डोके ठिकाणावरच आहेे.

सध्‍याची देशाची परिस्‍थीती बघि‍तली तर देशप्रेमी व देशद्रोही यांची उघड उघड रस्‍सीखेच चालली आहे. असेच जर चालू राहिले तर कमी शिक्षित लोकांना देशद्रोहींंची बाजू लवकर पटते असे दिसते. सतत ओरडत राहिले तर असत्‍य सुध्‍दा सत्‍य भासू लागते. हिच रणनिती विरोधी पक्षांनी अमंलात आणून सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न चालविला आहे.

दंगेेेेेेेेधोपे नको म्‍हणून सर्वसाधारण हिंदू लगेच हिंसाचारापुढे नमतो व कॉंंग्रेसला पुन्‍हा निवडूण देतो. हि नेहमीची पध्‍दती अवलंबून कॉंग्रेस देशात हिंसाचार पेटवून आपली पोळी येत्‍या निवडणूकीमध्‍ये भाजून घेण्‍याचे स्‍वप्‍न बघत आहे.

सरकार जे काही देशहिताचे निर्णय घेत आहे, त्याविरूध्‍द अफवा परसवून जनतेत संभ्रमणाचे वातावरण निर्माण करून, करता येईल तेवढी दिशाभूल करून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्‍याचे जीवतोड प्रयत्‍न विरोधकांकडून केले जात आहेत. भाजपा सरकार संविधान विरोधी कसे आहे व त्‍यामुळे देश कसा धोक्‍यात आला आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी देशद्रोहयांची उघड मदत विरोधक घेत आहेत. अर्थातच जनता पूर्वीइतकी मुर्ख राहिली नसली तरी, सखोल विचार न करणारे या प्रचार पध्‍दतीला लगेच बळी पडतात. त्‍यांना विरोधकांची आतली खेळी समजत नाही. त्‍यांना इतिहास पुरेसा माहिती नसतो, त्‍यांना जागतिक घडामोडी समजत नाहीत. त्‍यांच्‍यासाठी आजचे सर्व निर्णय हे डोक्‍याला विनाकारण झालेला ताप असताेे. अशी जनता ही ि‍विरोधकांच्‍या खेळीला सहज बळी पडते.

आज जर भाजपाची साथ आपण सोडली तर भविष्‍य अवघड आहे. आज देशाच्‍या पंतप्रधान व त्‍यांच्‍या साथीदारांना वाटेल तसे तोंड सोडून बोलण्‍याची पध्‍दत रूढ झाली आहे. हुकूमशहापासून तर निर्दय तानाशाह पर्यंत सरकारवर टिका सुरू आहे. अगदी खालच्‍या थराला जावून देश, विघातक शक्‍तींच्‍या ताब्‍यात देण्‍यास विरोधक अगदी उताविळ आहेत.

सरकारच्‍या निर्णय घेण्‍याच्‍या शक्‍तीचे कौतूक करण्‍याचे सोडून सरकारला मुर्ख ठरविण्‍याचे षडयंंत्र पुर्ण ताकदीने चालू आहे. परंतू आज जागा झालेला समाज सर्वांना ठणकाहून सांगत आहे की, सरकारने घेतलेले निर्णय पूर्णपणे देशहिताचे असून डोके शुध्‍दीवर ठेवून घेतलेले आहेत. अर्थातच सरकारचे डोके पूर्णपणे ठिकाणावर असून विरोधकांची डोकी ठिकाणावर आहे का याचा विचार जनतेने करण्‍याची व विरोधकांचा देशद्रोही डाव उधळून लावण्‍याची सक्‍त गरज आहे.

उदया जर विरोधी पक्ष सत्‍तेवर बसला तर सामान्‍य जनतेची काय दशा होईल याचा विचारही करवत नाही. आज जर भाजपा नसती तर पेेेेेेेेट्राेेेल 150 रूपयांच्‍या पुढे गलेले असतेेे.

असो कालाय तस्‍मै नमः