स्‍त्री-पुरूष असमानता

कायदयाच्‍या जगात सर्वजण सारखे समजले जातात. सर्वांंना समान न्‍याय मिळावा म्‍हणून कायदा तयार केला गेला. परंतू आज तोच कायदा न्‍यायाच्‍या नावाखाली अन्‍याय करत आहे व त्‍याचा साधा विरोधसुध्‍दा पुरूष करू शकत नाही.

स्‍त्री सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली स्त्रि‍यांच्‍या शब्‍दाला अवास्‍तव महत्‍त्‍व देवून कायदयाने समस्‍त पुरूष मंडळींवर उघड उघड अन्‍याय करण्‍याचे सत्र, न्‍यायाच्‍या नावाखाली सुरू केले आहे. स्‍त्री बोलेल ते ब्रम्‍हवाक्‍य समजून पुरूषांचे म्‍हणणे ऐकून न घेता त्‍यांच्‍याविरूध्‍द सराईत गुन्‍हेगारासारखे गुन्‍हे नोंदवून जगणे मुश्‍कील करण्‍याचे काम कायदयाने केलेले आहे.

खास करून पती व त्‍याचे घरचे म्‍हणजे वेठबिगार असल्‍यासारखी वागणूक कायदा देत आहे. पती व सासरचे यांचे म्‍हणणे ऐकून न घेता खरे-खोटे यांची शहनिशा न करता सरळ उचलून जेलमध्‍ये टाकण्‍याचे आदेश पोलिसांना देणेत आलेले आहेत. त्‍यांना तर आयतेच कुरण मिळाले आहे. कुुुुुुुुुुुुुुुटूंबव्‍यवस्‍थेचा फज्‍जा उडविण्‍याचे काम आज कायदा स्‍वतः करत आहे.

आजची स्‍त्री हि स्‍वतःच्‍या फायद्यासाठी बिनदिक्‍कतपणे खोटे आरोप करून, कायदयाचा आसरा घेउन पैसे उकळण्‍याचे काम करत आहे. तसे करणे तिचा हक्‍कच आहे असे प्रतिपादन कायदा करतो. विश्‍वासघातकी स्‍त्रीया याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत, व नैराश्‍यातून पती आत्‍महत्‍त्‍या करत आहेत.

आजकाल अनेक मुलींचे शाळेत असल्‍यापासूनच प्रेमप्रकरणेे सुरू असतात. परंतू घरच्‍यांच्‍या दबावाने त्‍यांना दुसरीकडे लग्‍न करावे लागते. काहींचे मन वर्षा दोन वर्षातच भरते, संसार ओझेे वाटायला लागतो. काहींच्‍या अपेक्षा पती पुुर्ण करू शकत नाही. मग पती व सासरचे अडचण वाटायला लागतात. त्‍यांचा छोटासा विरोध सुध्‍दा भयानक वाटायला लागतो. माहेरी कागाळया, तक्रारींचा पाउस पडायला लागतो. माहेरच्‍यांना वाटते की मुलीला भयानक त्रास सुरू आहे. यातच कधीतरी पतीचा तोल सुटतो आणि एखादी कानाजवळ वाजविली जाते. त्‍यानंतर खरेे महाभारत सुरू होते.

थोडे खरे अन बरचसे खोटे आरोप, प्रत्‍यारोप यात सासर माहेर दोन्‍ही भरडून निघतात, वकीलांची सुगी सुरू होते. पतीचे पैसे कमी होउन वकीलांंची इस्‍टेट वाढते. पती चारचाकी वरून दोनचाकी वाहनावर येतो. उलट वकील दोन चाकी वाहनावरून चारचाकी वाहनावर येतो. हे सगळे ि‍दिसत असूनही या चक्रातून बाहेर कसे यायचे हे दोघांनाही कळत नाही. अन कळलेच तर वळत नाही. चार सहा वर्षांनी जर निकाल लागला तर लागला नाहीतर आयुष्‍य निघून जाते.

पतीला अद्दल घडविण्‍याच्‍या नादात स्त्रीया आपल्‍या स्‍वतःचे व मुलांचे भविष्‍य बिघडवून टाकतात. अशा स्थितीत समजदार माणसाला मध्‍ये घेवून तातडीने वाद मिटविणे गरजेचे असते. परंतू सुशिक्षीत स़्त्रीचा अहंकार तडजोड करू देत नाही. सर्व सासर माहेरचे मानसिक स्‍वास्‍थ्‍य नष्‍ट करून यातील बर्याच स्रिया आपल्‍या बाहेरख्‍यालीपणाची हौस भागवून घेतात.

समाजाला कुपरिस्थितीला नेण्‍यास हा एकांगी कायदा जबाबदार आहे. खोटे आरोप करूनसुध्‍दा स्‍त्रीवर कसलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. कायदयाने खोटे आरोप करणे हा गुन्‍हा आहे. न्‍यायालयात शपथेवर खोटी माहिती देणे हा सुध्‍दा गंभीर गुन्‍हा आहे. असे म्‍हटले जाते की कायदा गाढव आहे ते अशा प्रकरणांमध्‍ये प्रकर्षाने समोर येते.

पूर्वीच्‍या काळी जर काडीमोड होणार असेल तर पंचायत भरून तातडीने निकाल दिला जात असे. परंतू आज मात्र वर्षन वर्ष केस रखडत ठेवून आयुष्‍याची परवड करण्‍याचे काम केले जाते.

जर एकत्र राहणे शक्‍यच नसेल तर आपआपसात तडजोड करून निर्णय घेणे गरजेचे आहे. मुलीच्‍या वडीलांनी लग्‍नासाठी केलेला खर्च भरून देण्‍याची कसलीही तरतूद कायदयात नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्‍यासाठी वाटेल तसे खोटे आरोप करून स्‍वतःची इज्‍जत घालवून मुलगी परत पतीकडे नांदायला पाठवण्‍याचा गाढवपणा अनेकजण करतात. त्‍यानंतर त्‍या स्त्रीला पतीच्‍या घरात पहिल्‍यासारखी किंमत राहत नाही. पतीलाही तिच्‍या सोबत राहणे कसेतरीच वाटत असते, यातून परत भांडणे व परत कोर्ट कचे-या सुरू होतात. यात मुलांचे अत्‍यंत हाल होतात. त्‍यांच्‍यावर विपरीत मानसिक परिणाम होतात. असे होउ नये म्‍हणून खास करून पत्‍नीने समंजस भूमिका घेणे महत्‍त्‍वाचे असते. अन्‍यथा मुलांचे वाटोळेे ठरलेलेच असते.

काळानुसार जिवनमानात अनेक बदल होतात. परंतू आजचे बदल बघीतले की एकच म्‍हणावेसे वाटतेः

कालाय तस्‍मैै नमः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *