अंगापेक्षा बोंगा मोठा |
अडला हरी गाढवाचे पाय धरी |
अती तेथे माती |
अती शहाण्याचा बैल रिकामा |
अन्नछत्री जेवायचे वर लोणचे मागायचे |
असंगाशी संग जिवाशी गाठ |
असतील शिते तर जमतील भूते |
आंधळं दळतं अन कुत्र पिठ खातं |
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे |
आंधळा बहिऱ्याची गाठ |
आधी पोटोबा मग विठोबा |
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास |
आपण हसे लोका शेंबूड आपल्या नाका |
आपलेच दात आणि आपलेच ओठ |
आयत्या बिळावर नागोबा |
इकडे आड तिकडे विहीर |
उंदराला मांजर साक्ष |
उचलली जीभ लावली टाळ्याला |
उठता लाथ बसता बुक्की |
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग |
उथळ पाण्याला खळखळाट फार |
उस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये |
एक ना धड भाराभर चिंध्या |
एकाच माळेचे मणी |
एका हाताने टाळी वाजत नाही |