पदरी पडले पवित्र झाले |
पळसाला पाने तीनच |
पाचही बोटे सारखी नसतात |
पाचामुखी परमेश्वर |
पायीची वहाण पायीच बरी |
पालथ्या घागरीवर पाणी |
पी हळद हो गोरी |
पुढच्याच ठेच मागचा शहाणा |
बडा घर पोकळ वासा |
बळी तो कान पिळी |
बाप तसा बेटा |
बाप से बेटा सवाई |
बावळी मुद्रा देवळी निद्रा |
बुडत्याचा पाय खोलात |
बुडत्याला काडीचा आधार |
बैल गेला आणि झोपा केला |
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले |
बोलेल तो करेल काय अन गर्जेल तो पडेल काय |
भरवशाच्या म्हशीला टोणगा |
भित्या पाठी ब्रह्मराक्षस |
भीक नको पण कुत्रा आवर |
भुकेला कोंडा निजेला धोंडा |
मऊ लागले म्हणून कोपराने खंणू नये |
मनात मांडे पदरात धोंडे |
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात |