घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात |
घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे |
घरोघरी मातीच्या चुली |
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे |
चोर सोडून संन्याशाला फाशी |
चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक |
चोराच्या उलट्या बोंबा |
चोराच्या मनात चांदणे |
चोर नाही तर त्याची लंगोटी |
चोरावर मोर |
पाण्यात राहून माशाची वैर करू नये |
जसे दाम तसे काम |
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे |
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी |
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही |
जेवेन तर तुपाशी नाहीतर उपाशी |
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी |
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी |
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे |
ज्याच्या हाती ससा तो पारधी |
झाकली मूठ सव्वा लाखाची |
टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही |
डोळ्यात कांकड आणि कानात फुंकर |
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला |
तळे राखील तो पाणी चाखील |