अ-नैतिक ?

सुरूवात कोठून अन कशी करावी हेच समजत नाही, आजकाल मुल मुली शाळेत, कॉलेजला नक्‍की कशासाठी जातात याचा गुप्‍तहेरांमार्फत शोध घेणे गरजेचे झाले आहे. नेमक काय चाललय! पालकांना वाटतय शिकताय पाल्‍य, शिकताय ते खर पण नको ते शिकण पण चाललय.

पालकांनी किती भोळे असावे याला काही मर्यादाच नाही. आपली मुलगी, मुलगा शाळा कॉलेजच्‍या नावाखाली एका दिवसात 100 किमी फिरून साळसूदपणे वेळेत घरी येवून जेवण करतात, आणि ढेकर देवून उदया लवकर जायचे आहे असे सांगून लवकर झोपी जातात. तेंव्‍हा पालकांना किती समाधान वाटते. पालकांनीच घेवून दिलेला मोबाईल गुप्‍तहेरांच्‍यापेक्षा जास्‍त सफाईने वापरून पुन्‍हा नामोनिशाणी न सोडण्‍यात पाल्‍यांचा हातखंडा भोळया पालकांना समजत सुध्‍दा नाही हो. पाल्‍याची खडा न खडा माहिती ठेवणारे पालकसुध्‍दा आपल्‍या पाल्‍याच्‍या हुशारी बद्दल गाफील असतात. त्‍यांची मुलगी, मुलगा निरागसतेचे, भोळेपणाचे असे नाटक करत असतो की, खरी माहिती पुरवणारी व्‍यक्‍ती खलनायक वाटते.

आज बर्याच मुला-मुलींना कमीत कमी दोन प्रकरणे केल्‍याशिवाय शाळेतून कॉलेजला जाणे कमीपणाचे वाटते. कित्‍येकांनी तर शाळेच्‍या वयातच बाकी काहीच ठेवलेले नसते. पालकांना गर्भनिरोधकांची माहिती नसते एवढी यांना असते. हे लोण शहरापुरतेच मर्यादीत नसून अगदी तालूका ते गाव पातळीपर्यंत पोहचले आहे. गावात लगेच चर्चा होते म्‍हणून प्रमाण कमी आहे. परंतू शहर व तालूक्‍यांमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये तर पढे जाण्‍याची स्‍पर्धा लागली आहे. कोणीच मागे नाही. हे सर्व पाहता अगदी नाईलाजाने असे म्‍हणावेसे वाटते की मुलींना न शिकवता लहानपणीच लग्‍न लावून दिले जात असे तेच योग्‍य होते. या वयात शारिरीक आकर्षण असतेच पण सयंमपण गरजेचा असतो हेच आजकाल शिकवले जात नाही.

महाविदयालयात जाईपर्यंत तर अनेकांंचे दोन-तीन संसार होउन गेलेले असतात. अश्‍या व्‍यक्‍ती पुढील आयुुुुुुष्‍यात काय अन कसा संसार करणार, दोघांनाही माहित असते की फक्‍त तडजोड चाललीय, चालली तोपर्यंत चालते नंतर रस्‍ते वेगळे वेगळे. यामुळे खरेतर घटस्‍फोटाचे प्रमाण वाढत आहे. परंतु पालक आजही जुन्‍या परंपरांच्‍या ओझ्या खाली पाल्‍याचे लग्‍न लावून देतात. परंतू पुलाखालून किती पाणी आधीच वाहून गेले आहे याची बर्याच पालकांना साधी कल्‍पना सुध्‍दा नसते.

माझा मुलगा किंवा मुलगी तसल काही करणारच नाही याची त्‍यांना पुरेपूर खात्री असते. त्‍यामुळे त्‍यांना प्रकरण समजले तरी समोरच्‍यावर खापर फोडून नामानिराळे राहचे कसे याचे प्रात्‍यक्षिक बरेच पालक समाजाला करून दाखवतात. आपला गंगाधरच शक्‍तीमान आहे याची साधी शंका सुध्‍दा त्‍यांना येत नाही. मुला मुलींचे मित्र मैत्रि‍णी एकमेकांना सांभाळून घेत पालकांची भूमिका सुध्‍दा यथार्थपणे बजावतात. आपल्‍या पाल्‍यापेक्षा त्‍यांच्‍या मित्रांंवर अधिक भरोसा ठेवणारे पालक, भरोश्‍याच्‍या म्‍हशीला टोणगा ही म्‍हण विसरलेले असतात, किंवा त्‍यांना ती म्‍हणच माहित नसते.

आजच रिलेशनशिप अशा गोंडस नावाखाली शरिरसुख सर्रास भोगले जात आहे. लग्‍नाचे बंधन मुला-मुलींना अजिबातच नकोय, परंतू बिनलग्‍नाचेे जर बाळ झाले तर पुढे काय करायचे याची योजना नसल्‍याने लग्‍न व्‍यवस्‍था अजून तरी टिकून आहे. आज तरी समाजाचा थोडा दबाव आहे म्‍हणून लग्‍न करून घटस्‍फोट तरी घेतला जातो. पण लवकरच लग्‍न ही पध्‍दती बंद होईल. मंगल कर्यालयावाल्‍यांनी आधीच तरतूद करून ठेवावी.

आम्‍ही मोबाईल रोज तपासतो, बरेच जण असा दावा छातीठोकपणे करतील. अरे पण जर त्‍यात काही पुरावा शिल्‍लक ठेवला असेल तर काहीतरी हाती लागेल ना, सिमकार्ड सुध्‍दा वेगळे असते व नंबरसुध्‍दा मोबाईलमध्‍ये न साठवता करता मेंदून साठवलेला असतो.

एज्‍यूकेशन व एजॅॅॅॅॅॅॅॅॅॅक्‍युलेशन एकसाथच करणारी ही पिढी पाहून, सुप्रि‍म कोर्टानेसुध्‍दा व्याभिचार व समलैंगिकतेला गुन्‍हयाच्‍या श्रेणीतून बाहेर काढले आहे. अशा वेळी बिचारे पालक काय करणार. फकत एवढेच म्‍हणणारः

कालाय तस्‍मै नमः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *